तुळसण घाटातील ‘त्या’ दरोडेखोरांना ७२ तासांत अटक
कराड (अभयकुमार देशमुख) :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी उमेश रघुनाथ खबाले राहणार विंग हे दिनांक 27 रोजी रात्री आठ वाजता त्यांच्या दत्तगुरु स्टोन क्रशरवरून दिवसभर झालेल्या व्यवहाराची रक्कम दोन लाख दोन हजार घेऊन बोलेरो जीप मधून जात असताना मोटरसायकल वरून आलेल्या अज्ञात इस्मानी त्यांना अडवून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून पैशाची पिशवी जबरदस्तीने हिसकावून पळवून नेली.
या घटनेची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक अली महंमद मुल्ला यांच्या अधिपत्याखाली पथक तयार करण्यात आले. या पथकाने बारामती वालचंद नगर या परिसरातून सदर गुन्ह्यातील पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबूल केले.
या पाचही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दिनांक 3 अखेर पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर डीवायएसपी रंजीत पाटील पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अली महंमद मुल्ला पोलीस हवालदार महेश लावंड उत्तम कोळी पोलीस नाईक सज्जन जगताप सचिन निकम सचिन साळुंखे यांनी केली आहे.