गोवा

काणकोण, सांगे, केपेसाठी काँग्रेसचे नवे ब्लॉक अध्यक्ष

पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा प्रदेश काँग्रेस समितीने पक्षसंघटना बळकट करण्याच्या उद्देशाने कुशावती जिल्ह्यातील काणकोण, सांगे आणि केपे विधानसभा मतदारसंघांसाठी नव्या ब्लॉक अध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली आहे.


प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या नियुक्त्यांनुसार गॉस्पर जोसेफ कुतिन्हो यांची काणकोण, डायगो फर्नांडिस यांची सांगे आणि विठ्ठल झेंबू नाईक यांची केपे विधानसभा मतदारसंघाच्या ब्लॉक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.


काँग्रेसने माजी ब्लॉक अध्यक्ष आबेल टी. बोर्जेस, जितेंद्र नाईक आणि अवधूत आमोणकर यांनी पक्षासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


यावेळी गिरीश चोडणकर यांनी सांगितले की, नव्या नियुक्त्यांमुळे पक्षाची तळागाळातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल. बूथ आणि गावपातळीवर पक्षसंघटना सक्षम करण्याबरोबरच स्थानिक जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी नव्या ब्लॉक अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!