google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्र

‘आता राज्यसभा नव्हे, तर संपूर्ण राज्यच घेणार!’

राज्यसभेची सहावी जागा अपक्ष म्हणून लढवण्याची संभाजीराजे छत्रपतींची (Sambhajiraje Chhatrapati) इच्छा आहे. मात्र शिवसेनेनं संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) असे आपले दोन्ही उमेदवार जाहीर केले आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) पाठिंबा जाहीर न केल्यानं संभाजीराजेंची कोंडी झाली.

तर त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानं मराठा संघटनांमध्ये नाराजी पसरली आहे. संभाजीराजेंनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या वतीनं आता एक पोस्टर व्हायरल होतं आहे. आता राज्यसभा नव्हे, तर संपूर्ण राज्यच घेणार! इतिहासाची पुनरावृत्ती, महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती असा उल्लेख त्या पोस्टरवर आहे. 2024 ची विधानसभा निवडणूक हे लक्ष्य असेल, असा सूचक इशाराही राजे समर्थकांनी दिलाय..

संभाजीराजेंना उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी सर्वात आधी पाठिंबा दिला. आता मनसेचे एकमेव आमदार राजू रतन पाटील यांनीही ट्विट करून राजेंच्या उमेदवारीसाठी पुढाकार घेतलाय. पण 42 आमदारांचा पाठिंबा मिळणं अवघड असल्यानं संभाजीराजेंची राज्यसभेची वाट सध्या तरी अशक्यच मानली जातेय.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!