google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्र

…आणि ‘राष्ट्रवादी पुन्हा..’ ने झाले चंद्रकांत पाटीलांचे स्वागत

पुणे (अभयकुमार देशमुख) :

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात माजी पुणे महापालिका गटनेते गणेश बिडकर यांच्या एका कार्यक्रमाला हाजेरी लावली होती. पालकमंत्रांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी व्यवस्था आणि डीजे लावण्यात आला होता. मात्र या डीजेने विरोधी गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गाणं वाजवल्याने एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसच थीम सॉंग राष्ट्रवादी पुन्हा अशी गाणं वाजवल्यानंतर पोलिसांनी त्या डीजेला त्वरित ताब्यात घेतले.

भाजपाचे महानगरपालिकेतले माजी गटनेते गणेश बिडकर यांच्या वॉर्डात हालयांची सागर दर या कार्यक्रमांचं दर वर्षी प्रमाणे नियोजित करण्यात आला होता. यासाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. ते कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचताच तिथे उपस्थित असलेल्या डीजेने राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रचार गीत लावलं. यानंतर एकच गोंधळ उडाला.

त्यानंतर पोलिसांनी या डीजेला ताब्यात घेतलं, त्यामुळे सारेच बुचकळ्यात पडले. त्यामुळे परिसरात एकच वातावरण तापले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!