Home

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांना अटक

ठाणे:

ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनीच ‘एबीपी माझा’शी बोलताना ही माहिती दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचे आवाहन केले. त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. त्यात एका प्रेक्षकाला मारहाणही झाली. याच प्रकरणामध्ये आव्हाड यांच्यासहीत राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना पोलीस स्थानकामध्ये बोलवून घेण्यात आलं आणि नंतर अटक करण्यात आली.

जितेंद्र आव्हाड यांनीच यासंदर्भात ‘एबीपी माझा’ला माहिती दिली. दुपारच्या सुमारास विवीयाना मॉल ज्या वर्तकनगर पोलीस स्थानकाअंतर्गत येतो त्या पोलीस स्थानकामध्ये आव्हाड यांना बोलवण्यात आलं. त्यानंतर त्या ठिकाणी ठाण्याचे डीसीपी पोहोचले आणि त्यांनी आव्हाड यांना अटक करण्यात येत असल्याची माहिती दिली. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी सध्या वर्तकनगर पोलीस स्थानकाबाहेर आहे. आव्हाड बाहेर येईपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली असून परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.



आव्हाड यांनी यासंदर्भात, “मला पोलीस स्थानकात बोलवलं. नोटीस घ्यायला बोलवलं. त्यावेळेस मला मुंबईला जायचं असल्याने मीच येतो पोलीस स्थानकात नोटीस घ्यायला असं सांगितलं आणि इथं आलो. त्यानंतर मी इथं चहा पीत असतानाच डीसीपी राठोड आले. त्यांची हतबलता चेहऱ्यावर दिसत होती. त्यांनी मला तुम्हाला अटक करावी लागेल असं म्हणाले,” अशी माहिती दिली.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
%d bloggers like this: