google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

शाहरुखचा ‘डंकी ड्रॉप वन’ पाहिला का?

‘डंकी’ या चित्रपटाची पहिलीवहिली झलक ‘डंकी ड्रॉप वन’ आज शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित करण्यात आली, शाहरूखच्या वाढदिवसाचे औचित्य साधल्याने हा चित्रपट शाहरूख खानच्या सर्व चाहत्यांसाठी अधिकच खास ठरला आहे.

ज्यांना एक उत्तम कथाकार म्हणून ओळखल्या जाते आणि ज्यांच्या नावे काही सर्वाधिक हिट ठरलेले आणि शानदार चित्रपट आहेत, ते राजकुमार हिराणी यावेळी ‘डंकी’ नावाच्या हृद्य आणि विनोदाने परिपूर्ण असलेल्या आणखी एका नितांत सुंदर चित्रपटासह सिनेरसिकांचे रंजन करण्यासाठी परतले आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने आजच्या पिढीची दोन सर्वात प्रिय नावे अर्थात शाहरुख आणि राजू हिराणी एकत्र आले आहेत!


चित्रपटातील गोडवा व नॉस्टॅल्जिया परत आणणे आणि जुन्या आठवणी ताज्या करणे हा या चित्रपटाचा उद्देश आहे. निर्मात्यांनी आज ‘डंकी ड्रॉप वन’चे अनावरण केले, ज्याl प्रेक्षकांना राजकुमार हिराणींच्या अनोख्या दुनियेची झलक पाहायला मिळाली. ही चार मित्रांची हृदयस्पर्शी कथा असून यांत विदेशातील किनार्‍यावर पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ‘डंकी ड्रॉप वन’ म्हणजे या मित्रांची स्वप्ने साकारण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या अनोख्या, जीवन बदलणाऱ्या प्रवासाची एक झलक आहे. वास्तवातील जगण्यात येणाऱ्या अनुभवांनी प्रेरित, ‘डंकी’ ही प्रेमाची आणि मैत्रीची एक उत्फुल्ल कथा आहे, जी या कथांना एकत्र आणते आणि आनंददायक व हृदयाचा ठाव घेणारी उत्तरे देते.

बोम्मन इराणी, तापसी पन्नू, विक्की कौशल, विक्रम कोचर, अनिल ग्रोव्हर आणि शाहरुख खान अशा विलक्षण प्रतिभावान कलावंतांनी साकारलेल्या रंगीबेरंगी पात्रांसह तुमच्यासमोर पेश झालेला हा व्हिडिओ तुम्हांला या चित्रपटाच्या ‘रोलरकोस्टर’ची धमाकेदार सफर घडवून आणेल.

हा व्हीडियो तुम्हांला एका मोहक, हृदयस्पर्शी आणि अनोख्या कथेची झलक दाखवते, ज्या चित्रपटात सिनेमॅटिक कथाकथनाचे पुनरागमन होत आहे आणि येत्या ख्रिसमसमध्ये हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज आहे.

जिओ स्टुडिओज, रेड चिलीज एंटरटेनमेन्ट आणि राजकुमार हिराणी फिल्म्स प्रस्तुत, राजकुमार हिराणी आणि गौरी खान यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. राजकुमार हिराणी यांच्यासह अभिजात जोशी आणि कनिका धिल्लन यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!