google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

शिवाजी शिंदे यांना वेदांत फाऊंडेशनचा पुरस्कार

बेळगाव :

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार बेळगावच्या वेदांत फौंडेशनच्या वतीने आयोजिण्यात आला आहे. शिक्षण, पत्रकारिता आणि पोलीस दलातील उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार ‘वेदांत एक्सलन्स अवॉर्डने’ करण्यात येतो.

पत्रकारिता क्षेत्रात दैनिक पुढारीचे शिवाजी शिंदे, इन न्यूज वाहिनीचे संपादक राजशेखर पाटील, दि न्यू इंडियन एक्स्प्रेसचे सुनील पाटील यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

यंदा शिक्षण क्षेत्रात ठळकवाडी हायस्कुलचे शिक्षक सी. वाय. पाटील, शाहूनगर सरकारी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका बेबीआसमा नाईक, बसुर्ते येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेच्या शिक्षिका अनुराधा तारिहाळकर, सरकारी उच्च प्राथमिक  शाळा क्रमांक २४ च्या शिक्षिका सुजाता लोखंडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

तर पोलीस दलातील ए.पी.एम. सी.पोलीस स्थानकातील केंम्पांना दोडमनी, उत्तर विभाग रहदारी पोलीस स्थानकाचे काशिनाथ इरगार यांना वेदांत एक्सलन्स अवॉर्ड जाहीर झाला आहे.

हा संपूर्ण कार्यक्रम होनगा येथील आणि सध्या दुबईस्थित इंजिनिअर रमेश आनंदाचे यांनी प्रायोजीत केला असून या कार्यक्रमांतर्गत देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम असे आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!