google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

वेचल्यात बेकायदेशीर वृक्षतोडीला वनविभागाचे अभय?

सातारा (महेश पवार) :

वनविभागाच्या ढिसाळ कारभारामुळे हा विभाग नेहमीच बदनाम झाला आहे. आणि त्यातच अनेक प्रकरणांमुळे गाजणाऱ्या या विभागाच्या अब्रूची लक्तरे वेचले(ता.सातारा) येथे होत असलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीमुळे पुन्हा चव्हाट्यावर लागली आहे.माहिती।मिळूनही कारवाई न करणारे अधिकारी आणि त्यात कहर म्हणजे उपस्थितानीच कर्मचारी मॅनेज असल्याची वक्तव्य केल्याने वनविभागात खाबूगिरी उघड्यावर आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की सातारा तालुक्यातील शेळकेवाडी-वेचले गावच्या रस्त्यावर असणाऱ्या नदी जवळच्या परिसरात अनेक वृक्षांची बेकायदेशीर कत्तल करून खाजगी वाहनाने वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती साताऱ्यातील पत्रकारांना शुक्रवारी मिळाली. ती माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी नियुक्त असणाऱ्या वनपाल आणि वनरक्षक यांना याबाबतची कल्पनाही देण्यात आली होती. माहिती दिल्यानंतर जवळपास एक तासानंतर कारवाई झाली आहे का?हे विचारण्यासाठी फोन केल्यानंतर वनपाल आणि वनरक्षक कारवाईसाठी त्या ठिकाणी गेलेच नसल्याचे समजले.

यानंतर पत्रकार वृक्षतोड होत असलेल्या घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी विना नंबरच्या जॉन डीअर ट्रॅक्टर मधून बेकायदेशीर वृक्षतोड झालेली लाकडे वाहतूक होत असल्याचे आढळून आले.संबंधितांना वृक्षतोड व वहातुक परवण्यासंदर्भात विचारले असता त्यांनी परवानगी घेतली नाही अशी माहिती दिली.भरदिवसा खुलेआम बेकायदेशीरपणे वृक्षतोड करून वहातुक होत असताना या विभागातील वनपाल व कर्मचारी नमके काम काय करतात? या घटनेची माहिती संबंधितांना देऊनही अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी कारवाईस का गेले नाहीत? यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले असून या कर्मचाऱ्यांच्या कृपाशीर्वादामुळेच ही बेकायदेशीर वृक्षतोड झाली असल्याची चर्चा सुरू आहे.

वनकर्मचारी मॅनेजची उपस्थितांची माहिती
घटनास्थळी पोहोचल्यानंतर संबंधित पत्रकारांनी तेथे उपस्थित असणाऱ्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी दोन युवकांनी वनविभाग मॅनेज आहेत. त्यामुळेच कोणतीही कारवाई होणार नाही हे त्या बेकायदेशीर वाहतूक करणाराला ठाऊक होते.या विभागात असे प्रकार सर्रास होत असतात अशी माहिती दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!