अमित पालेकर यांचा अंतरिम जामीन मंजूर…
बाणस्तारी येथे झालेल्या मर्सडीज अपघात प्रकरणात क्राईम ब्रँचने गुरूवारी आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांना अटक केली. जिल्हा व सत्र न्यायालयाने अमित पालेकर यांना 50 हजार रुपयांच्या जामीन जातमुचलक आणि तेवढ्याच रकमेच्या जामीनावर पुढील आदेशापर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
या अपघातातील मर्सडीज परेश सावर्डेकर चालवत होता. त्याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत तिघांचा बळी घेतला होता. तथापि, त्याचा बचाव करण्यासाठी अमित पालेकर यांनी एका बनावट चालकाला तयार केले आणि त्याला म्हार्दोळ पोलिस स्थानकात नेले होते, असे तपासात आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
दरम्यान या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता तर तिघे जण जखमी झाले होते. एका पार्टीतून बाहेर पडल्यानंतर सावर्डेकर कुटूंबीय मर्सडीजमधून जात असताना हा अपघात झाला होता.
त्या पार्टीचे फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यात अमित पालेकर देखील दिसून येत होते.